अहमदनगर Live24 :- अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. तुला कोरोना झाला आहे. चल तुला घरी सोडवितो. असे म्हणत तिला मिठी मारली.
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा काही तासात तपास करुन पोलिसांनी अजिंक्य दामोदर मालुंजकर (रा. उंचकडक खुर्द) यास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक 12 वर्षाची मुलगी रानात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. ती रस्त्याने घरी जात असतांना त्यावेळी अजिंक्य मालुंजकर हा त्याच रस्त्याने जात होता. त्याने वाहन थांबवून पीडित मुलीस गाडीवर बसण्यास सांगितले.
या मुलीने नकार दिला असता तो म्हणाला की, तुला कोरोना झाला आहे. तुला तुझ्या घरी सोडवितो. त्यानंतर त्याने पीडितेस गाडीवर बसवून घेत पुढे जाऊन एका उसात नेले. तुला कोरोना झाला आहे. असे म्हणत या माथेफिरुने तिला मिठी मारली. त्यानंतर या मुलीने स्वत:ची सुटका करीत थेट घर गाठले. तेथे गेल्यानंतर हा प्रकार पालकांना सांगितला असतात त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच एक पथक तयार केले. फिर्याद लक्षात घेता केवळ काही संशयीत बाबी तपासून घेत त्यांनी तपासाची चक्रे फिरविली.
पीडित मुलीने सांगितल्यानुसार आरोपीच्या गळ्यात एक लाल रंगाचे आयडेंटीकाड होते. त्यानुसार हे कार्ड नेमके कोणत्या संस्थेचा आहे. याबाबत तपास सुरू झाला. अखेर माहिती मिळाली की, हे कार्ड कारखान्याचे असून तो संशयीत कोण असू शकतो.
त्यानंतर पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांचे फोटो पीडित मुलीस दाखविले. नंतर मालुंजकर याच्याबाबत तपास केला असता त्याची वागणूक पाहुन त्याचा फोटो पीडित मुलीस दाखविण्यात आला. तीने त्यास ओळखले असता पोलिसांनी याला बेड्या ठोकल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®