अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेविकेच्या पतीच्या खिशातील मोबाईलचा झाला स्फोट ! एकच खळबळ …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना अनेकदा आपण ऐकल्यात.अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा शहरात अशीच घटना घडलीये.

एका व्यक्तीच्या खिशामध्ये असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडलीय श्रीगोंदा शहरातील नगरसेविका सीमाताई गोरे

यांचे पती प्रशांत गोरे यांच्या पँटच्या खिशातील विव्हो कंपनीच्या मोबाईलचा आज सायंकाळी अचानक स्फोट झाला

यात गोरे यांच्या पायाला दोन ठिकाणी भाजले आहे सुदैवाने यात गोरे यांना जास्त दुखापत झालेली नसली तरी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत गोरे हे पेडगाव रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत होते.

याच दरम्यान अचानक त्यांच्या पँटच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल मॉडेल वाय ७१ या मोबाईलचा अचानक स्फोट झाला

त्यांनतर खिशातील मोबाईलने पेट घेतला परंतु गोरे यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे यात त्यांना जास्त दुखापत झाली नाही, यात मोबाईलचे मोठे नुकसान झाले आहे स्फोटाच्या आवाजाने बाजूला उभे असलेले

लोक धावत त्याठिकाणी आले विशेष म्हणजे हा मोबाईल स्विच ऑफ होता तरीसुद्धा त्याचा असा स्फोट झाला हे विशेष

त्यानंतर गोरे यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले सुदैवाने गोरे यांना यात जास्त दुखापत झालेली नाही,

स्विच ऑफ व विव्हो सारख्या प्रसिद्ध कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मोबाईलचा स्फोट होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24