अहमदनगर ब्रेकिंग! जिल्ह्यात पाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांची धक्कादायक वाढ होत आहेच तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.

जिल्ह्यात गेल्या ३६ तासात कोरोना रुग्ण संख्येत ७४४ ने वाढ झाली. आज उपचारादरम्यान १८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१३ रुग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या ४ हजार ७२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८ आणि अँटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण बाधित आढळले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24