अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- पोटात टणक वस्तूने बेदम मारहाण केल्याने धांदरफळ येथील भिमा बाजीराव डोके, वय २२ या तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार १९ डीसेंबर रोजी घडला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, भिमा बाजीराव डोके या तरुणास आरोपी अजय मलखान तामचीकर, रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर याने राहात्या घरी लोखंडी टणक वस्तूने पोटावर बेदम मारहाण केली तेव्हा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर स्थितीत भिमा बाजीराव डोके याला नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना भिमा डोके हा मरण पावला.
तेथील डॉक्टरांनी भीमा डोके या तरुणाच्या पोटावर टणक वस्तूने मारा झाल्याने त्याच्या आतड्यास छिद्र पडल्याने त्याचा मृत्यू झाला असे स्पष्ट केले,या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काल या प्रकरणी दिलीप बाजीराव डोके या मयताच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अजय मलखान तामचीकर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.