ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी महिलेची हत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये राहात होती. ती कामगार असल्याने दिवसभर काम करून तिथेच राहात असे.

५० ते ५५ वयाची या महिलेची हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office