अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जंगलात अजित रावसाहेब मदने या २२ वर्षीय युवकाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघा मित्रांनी बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मंगळवारी दोघांना ताब्यात घेतले असून मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून अजित याच्या खुनाची उकल झाली. संतोष झावरे, (टाकळी ढोकेश्वर) व किरण ऊर्फ बाळा जांभळकर, (वडगाव सावताळ) व मृत अजित मदने हे तिघेही जिवलग मित्र.
संतोष व किरण हे अजित यास अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडत होते. मंगळवारी सायंकाळी अजित यास फोन करून संतोष व किरण याने जत्रेला जाण्याचे कारण दाखवून बोलवून घेतले.
अनैतिक संबंध तसेच मोबाइलच्या गॅलरीमध्ये काय दडवले. याविषयी जाब विचारू लागले. यावेळी संतोष व किरणने त्यास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला.
अजित मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी त्याच्या खिशातील मोबाइल तसेच पैशांचे पाकीट काढून घेतले. अपघात झाल्याचा बनाव त्यांनी केला.
अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके व अजित पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, प्रमोद वाघ, उपनिरीक्षक गणेश इंगळे, कर्मचारी भालचंद्र दिवटे,
सत्यजित शिंदे, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, अण्णा पवार, मनोज गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, राहुल सोळंके यांनी चोविस तासांच्या आत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews