अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी यांचा मानेवर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डीतील साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे व आरोपी यांचे काही कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे मयत रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता.
याचा त्याच परिसरातील रहिवाशी असलेले आरोपींच्या मनात राग होता.त्यातून हि दुर्दैवी घटना घडली आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे व आरोपी यांचे काही कारणावरून भांडण झाले होते.
त्यामुळे मयत रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता.याचा त्याच परिसरातील रहिवाशी असलेले आरोपींच्या मनात राग होता.त्यांनी एकत्र जमून फिर्यादीचे वडील रवींद्र माळी यांना आरोपी विशाल रमेश पाटील,रा.चांगदेवनगर निमगाव,रवींद्र बनसोडे,रा.जोशी शाळा,समीर शेख रा.राहाता, यांनी धक्काबुक्की करून धरून ठेवले व अन्य आरोपी अज्जू पठाण रा.निमगाव,
रंजना वैजनाथ भांगे,ललिता रमेश पाटील दोघी रा.निंमगाव, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे,महेश गायकवाड,कुणाल जगताप,अजय वैजनाथ भांगे,यांनी त्यांच्या हातातील धारदार चाकूने मयत रवींद्र माळी याचे मानेवर जोराने वार करून दुखापत करून रात्री १०.३० वाजता खून केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved