अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय ३७) याने दारू पिण्यासाठी उधारीने पैसे घेतले होते.
मात्र अनेक दिवसानंतरही सुदाम हा आपले उधारीने घेतलेले पैसे देत नसल्याने आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा.लोहसर) या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणी नंतर सुदाम गिते याचा मृत्यू झाला.
याबाबत मयत सुदाम गीते याचा भाऊ आदिनाथ विक्रम गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून दारूच्या नशेपायी तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून,
या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली असल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि. परमेश्वर जावळे हे करत आहेत.