अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भांडणाच्या रागातून परप्रांतियाने युवकाचा गळा दाबून खून केला. नागापूर गावठाण येथे रविवारी रात्री ही घटना घडली.सोनू राजू वाघमारे असे त्याचे नाव आहे.
याबाबत नगर एमआयडीसी पोलीसांनी सुनिता परसू कांबळे या महिलेच्या फिर्यादी वरून रावजी विक्रम प्रसाद ( वय २२ रा.नागापूर गावठाण, अ .नगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनू वाघमारे व रावजी प्रसाद यांच्यात नेहमी भांडण होत असे. रविवारीही दोघांमध्ये भांडण जुंपले. यावेळी प्रसाद याने सोनू याचा गळा दाबल्याने वाघमारे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews