अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची हत्या ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे घडली आहे.

म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून ४५ वर्ष वयाच्या नरेंद्र सयाजी वाबळे याची आरोपी राजेंद्र बबन शिरवळे याने सोमवार दि.२० रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली.

धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वता पोलीस ठाण्यात हजर झाला.पोलीस ठाण्यात धावत येवून सदर आरोपी पोलिसांना म्हणाला साहेब, चला मी एकाचा कुऱ्हाडीने खून केला आहे..चला तो स्पॉट दाखवितो.

पोलीस त्याच्या बरोबर गेले तेव्हा तो खरे बोलत असल्याचे स्पष्ट झाले, घटनास्थळास पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली.निर्घृणपणे एक जण उसाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

नरेंद्र वाबळे याचे राजेंद्र शिरवळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा शिरवळे याला संशय येऊन याच संशयातून ही हत्या झाली असल्याचे समजते.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24