अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांचा कारचा सोमवारी नाशिक-पुणे रोडवर अपघात झाला सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत.
सोमवारी सायंकाळीपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात पवार यांना मुकामार लागला असून संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांनी अपघात स्थळी आणि रुग्णालयात धाव घेत पवार यांची विचारपूस केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष पवार हे काल सायंकाळी पाचच्या सुमारास नाशिक-पुणे रोडने संगमनेरमध्ये येत असतांना समोरून त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
अपघातानंतर पवार यांनी तातडीने संगमनेरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. ज्या वाहनामुळे अपघात झाला त्या अज्ञात वाहनाला पवार यांनी सोडून दिले.
अपघातात पवार यांना मोठी दुखापत झालेली नसली तरी त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व ज्येष्ठाच्या आशिर्वादामुळे गंभीर अपघातातून बचावल्याची भावना पवार यांनी बोलून दाखविली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved