अहमदनगर ब्रेकिंग : शहरात फिरणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात,गुन्हा दाखल आणि गाडीही झाली जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :-  संचारबंदीच्या काळात  श्रीरामपुर शहरात फिरणे राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला चांगलेच महागात पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांना संचारबंदीच्या काळात शहरात फिरण्यास बंदी घातली होती मात्र तरीही काही लोकप्रतिनिधी हा आदेश डावलत बाहेर फिरत होते.

यामुळे श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम हाती घेतली. संचारबंदीचे सर्व नियम मोडून भटकणाºया व अत्यावश्यक सेवेचे फलक लावून कायदा पायदळी तुडवणारा नागरिकांवर पोलिसांनी जरब बसवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे वाहनही पोलिसांनी जप्त करत त्यांच्यासह गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक पवार हे गेल्या काही दिवसांपासून धान्य वाटप तसेच औषध फवारणीचे काम करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात झळकले होते.

त्यांच्या कारला अत्यावश्यक सेवेचा फलकही लावण्यात आला होता. त्यांच्या कारसह रिक्षा जीप व दुचाकी अशा २५ वाहनावर कारवाई करत ते शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.

नगरसेवकांनी अत्यावश्यक कामासाठी प्रशासनाला सूचना द्यावी. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरू नये अशी जिल्हाधिकाºयांची सूचना होती.या कारवाईमुळे आता शहरात अनावश्यक फिरणाया राजकीय कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी यांना चाप बसणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24