अहमदनगर ब्रेकिंग न्यूज : ‘त्या’ ५१ मशिदी केल्या सील !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड बारा दिवसांपासून जामखेडमधील काझीगल्लीतील मशिदीत राहणारे १० परदेशी व ४ इतर राज्यांतील अशा चौदा नागरिकांपैकी दोघांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.

प्रशासनाने तातडीने पावले उचलत या चौदाजणांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नगरला पाठवले आहे. यातील २२ जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. नऊ जणांना सोडून देण्यात आले आहे.

काही पोलिसांचीही तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील २९ गावांतील, तर शहरातील बारा मिळून ५१ मशिदी सील करण्यात आल्या आहेत. १४ मार्चला नगर येथील मुकुंदनगर भागातून आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया या देशातील १० जण,

तर मुंबई व तामिळनाडू येथील ४ जण असे एकूण १४ जण काझीगल्लीतील मशिदीत २६ मार्चपर्यंत वास्तव्यास होते. संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याची कल्पना प्रशासनाला न दिल्यामुळे,

तसेच जमावबंदी असतानाही मशिदीत १४ जणांना वास्तव्यास ठेवल्यामुळे तीन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या चौदा जणांना तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. पाच जणांचे स्त्राव नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते.

महसूल प्रशासनाचे तातडीने पावले उचलत सोमवारी राजुरी, लोणी, सांगवी (मुसलमानवाडी), लोणी, बावी, हळगाव, दिघोळ, पाटोदा, धनेगाव, फक्राबाद व पिंपळगाव आळवासह जामखेड शहरातील काझीगल्ली व खर्डा चौकातील दोन मशिदींसह एकूण ५१ प्रार्थनास्थळे सील केली आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24