अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच निवडीदरम्यान एकावर धारदार शस्राने हल्ला!’या’ तालुक्यातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-सरपंच निवडीच्या पार्श्वभुमिवर पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे शशीकांत अडसूळ या चेअरमन बाळासाहेब कोरडे गटाच्या कार्यकर्त्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हल्ल्यात अडसूळ यांच्या मानेस गंभीर जखम झाली असून त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अडसूळ यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेस पोलिस प्रशासनाने दुजोरा दिला असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचपदाची मंगळवारी निवड होत असल्याने चेअरमन बाळसाहेब कोरडे गटाने पाच सदस्यांची बेरीज करून त्या सदस्यांना सहलीवर पाठविले होते.

९ पैकी पाच सदस्य एकत्र आल्याने बाळासाहेब कोरडे गटाचा सरपंच होणार हे निश्चित झाले होते. सकाळी नवनिर्वाचित सदस्याचा भाऊ शशीकांत अडसूळ हा मळयातून गावात येत असताना दोघांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला.

त्यास त्याच्या नातेवाईकांनी प्रथोमचार करून नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. विरोधी प्रकाश कोरडे गटाच्या सागर कोरडे व स्वप्नील जरड यांनी हा हल्ला केल्याचा आरोप बाळासाहेब कोरडे यांच्या गटाने केला आहे. दरम्यान पोलिसांनी यासंदर्भात एकास ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24