अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- आजारपणातून आलेल्या नैराश्यातून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील समाजमंदिरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली असून,
अनिल हरी शिंदे (वय ५२) असे त्या इसमाचे नाव आहे वाळवणे येथील समाजमंदीरात शनिवारी सांयकाळी ६.३० च्या दरम्यान पञ्याच्या अंगलला दोरीच्या साह्याने फाशी घेतली.
आत्महत्या केलेल्या इसमाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, “माझा भाऊ आनिल यास मुतखड्याचा आजार होता.
त्याचा त्रास जास्त प्रमाणात होत होता. झाला होता. याच्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी.” सुपा पोलिसानी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved