अहमदनगर ब्रेकिंग : पैसे मागितल्याने एकाची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-व्याजाचे पैसे मागितल्याचा रागातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात उंचखडक खुर्द येथे घडला आहे. यासंदर्भात अकोले पोलीस ठाण्यात हत्या व एट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम बुधा उघडे ( वय 62,रा.उंचखडक खुर्द) असे मृताचे नाव असून कैलास यशवंत घोडके (वय 45,रा.उंचखडक खुर्द) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत आधी माहिती अशी: मयत तुकाराम उघडे व आरोपी कैलास यशवंत घोडके (वय 45,रा.उंचखडक खुर्द) हे चांगले मित्र होते.

कैलास घोडके यांना तुकाराम यांनी दोन वर्षापूर्वी 50 हजार रुपये उसने दिले व त्यापोटी महिन्याला व्याज द्यायचे असे ठरले. व्याजाची रक्कम उघडे यांनी घोडके यांचेकडे मगितल्याचा राग येऊन शनिवारी सायं.

6.30 वाजेच्या सुमारास उंचखडक खुर्द गावातील एस.टी. स्टॅण्ड जवळ आरोपीने तुकाराम बुधा उघडे यांच्या डोक्यात वीट मारली.

यात उघडे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकोले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर आरोपी कैलास घोडके यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24