अहमदनगर ब्रेकिंग : नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  नगर मनमाड महामार्गावर दोन मालवाहू ट्रकचा भिषण अपघात झाला आहे.

आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून क्लिनर जखमी झाला आहे.

राहता कोर्टापासून काही अंतरावर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला

राजस्थानकडे जाणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली

ही धडक इतकी भिषण होती की उभा असलेला ट्रक थेट दुभाजकावर चढला

आणि धडक देणा-या राजस्थानच्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.

दरम्यान अपघातात कॅबीनचा चक्काचुर झाल्याने ट्रक ड्राव्हरचा मृतदेह काढण्यास तब्बल तीन तास प्रयत्न करावे लागले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24