अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक व्यक्ती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी शहाजापुर (ता.पारनेर) येथील शशिकांत गवळी व त्यांचा पुतण्या गणेश गवळी हे दुचाकीवरुन सुप्याच्या दिशेने येत असतांना पाठीमागून पुण्याकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने जोराची धडक दिली.
धडक इतकी जोराची होती कि दोन चाकीवरील चुलते पुतणे जोरात उडून पडले.यात शशिकांत गवळी जागीच ठार झाले तर गणेश गवळी गंभीर जखमी झाले.
जखमीला सुपा येथे खाजगी रुग्णालयात व नंतर पुणे येथे उपचारासाठी पाठवले. चारचाकी गाडी व चालक बाबासाहेब छबु माने (रा. महात्मा फुले विद्यापिठ, राहुरी) यास सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शशिकांत गवळी यांचा मृतदेह तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.