अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- देवदर्शनासाठी पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील सात ते आठजण जात असणाऱ्या बोलेरो गाडी व ट्रकाचा रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात राजापूर (ता.कोल्हापूर जि. रत्नागिरी) जवळ घडला असून, एकजण ठार तर अन्यजण जखमी झाले आहेत.
सचिन महादेव बडे हे मयत झाले असून सोमनाथ महादेव बडे, नागनाथ अजिनाथ बडे, अमोल अशोक गरड, भिमराव बाबासाहेब बडे, बाळू धनवे, शुभम सुरेश गरड, संतोष बाबासाहेब बडे, दत्ता सुभाष शेळके ही आठ जखमी असून यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे)
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com