अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील खडकवाडी -पळशी रस्त्यावर खडकवाडी शिवारातील रोकडेमळा जवळ पहाटे मोटारसायकल अपघात झाला.
यामध्ये राहुरी तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत. खडकवाडी-पळशी रस्त्यावर रोकडेवस्ती नजीक
सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (एम.एच.१७ बी.आय.२१७३) ही रस्त्याच्या खाली जावून झालेल्या अपघातामध्ये मंगेश शिवाजी बाचकर (वय- 21 वर्ष, रा.वावरथ जांभळी, ता.राहूरी) हा जागीच ठार झाला
तर मोटारसायकलवरील सुनिल भाऊसाहेब बाचकर व अशोक रखमा शेरमाळे हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खडकवाडी येथील राजू रोकडे,
शिवाजी शिंगोटे, बाळासाहेब शिंगोटे, अनिल मोढवे, सागर रोकडे यांनी जखमींना खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करून उपचार देण्यात आले.
हे तरूण मोटारसायकलवरून साकूर येथून बिरोबा देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून वावरथ जांभळी गावाकडे जात असताना खडकवाडी–पळशी रस्त्यावर खडकवाडी शिवारात हा अपघात झाला आहे.
यासंदर्भात मयत मंगेश बाचकर याच्यावर टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com