अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा जागीच खून झाला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन

येथील रहिवासी सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी मुकेशकुमार बडे यांनी धाव घेतली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यातील सर्व आरोपी पसार झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24