अहमदनगर ब्रेकिंग : विषारी औषध पोटात गेल्याने तरूणीचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील तरुणीचा विषारी औषध पोटात गेल्याने मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.सीमा प्रेमकुमार पासीय (वय ३०) असे तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सिमा हिला राहाता तालुक्यातील प्रवरा हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी दाखल केले होते.
तिथे उपचार सुरू असताना तिचा दुसऱ्या दिवशी ३१ रोजी मृत्यू झाला. विषारी औषध पोटात गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोणी पोलीस ठाण्यातून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24