अहमदनगर Live24 :- प्रशासनाच्या नियमांचे पालन करून भाजीपाला व फळविक्रीस परवानगी असतानाही पोलिसांनी भाजीपाला, फळविक्रेत्यांवर बुधवारी कारवाई केली.
त्यामुळे विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजीपाला विकणाऱ्यांना एका ठिकाणी किंवा फेरीद्वारे गर्दी टाळून विकण्यास परवानगी आहे.
या आदेशानुसार विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीस प्रारंभ केला असतानाही काही ठिकाणी कारवाई केली जात आहे. मोठ्या मेहनतीने आणलेला भाजीपाला व फळे त्याच दिवशी विक्री न झाल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®