अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :शिर्डी बस स्थानकाच्या समोरील सार्वजनिक शौचालयामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली होती, या घटनेचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला आहे 

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अज्ञात कारणावरुन अनोळखी इसमाचे डोक्यावर, हातावर व पायावर सिमेंटचे ब्लॉक व कोणत्यातरी हत्याराने मारुन त्यांस गंभीर जखमी करुन सदर अनोळखी इसमाची हत्या मयताची ओळख पटू नये व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयत व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढून चेहरा विद्रूप करण्यात आला होता.

या मयताची ओळख न पटल्याने फिर्यादी पो नायक मारुती लहानू गंभीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,अपर पोलीस अधीक्षक, दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

या तपास करण्यासाठी पथके तयार करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलिसांनी तपास करून आरोपी शोधून काढले . श्वान पथक तसेच अंगुली मुद्रा तज्ञाकडून घटनास्थळाची अतिशय बारकाईने पाहणी करण्यात आली.

त्या ठीकाणी मिळून आलेल्या साहित्याचे अतिशय सुक्ष्म निरीक्षण करण्यात आले त्यावरून पोलीस आरोपी पर्यंत पोहचू शकले. आरोपी राजेन्द्र गोविंद गवळी, वय- ३० वर्षे, रा. साठेनगर, ता- घनसांगवी, जि- जालना, सुनिल महादेव कांबळे,

वय- २१ वर्षे, रा. मारुती मंदीराजवळ, शिंगणापूर, ता- जत, जि-सांगली, सुनिल शिवाजी जाधव, वय- ३० वर्षे, रा. यशवंतनगर, सोनारवाडा, ता- बार्शी, जि- सोलापूर या तिघांनी

मयताचे पैसे काढून घेण्याचे उद्देशाने त्यांस शौचालयामध्ये नेवून सिमेंटचे पेव्हर ब्लॉक व स्टीलच्या रॉडने मारुन त्याची हत्या केली असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

तीनही आरोपी हे वेगवेगळ्यात जिल्ह्यातून शिर्डी येथे आलेले असून ते शिर्डी परिसरात मोलमजूरी करतात तसेच साईबाबा मंदीर परिसरात भिक मागून उदरनिर्वाह करतात.

त्यावरुन वरील नमुद तीनही आरोपींना सदर अनोळखी इसमाचे खूनाचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर अनोळखी मयत इसमाचे नाव शंकर उर्फ अण्णा असे निष्पन झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24