अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा (वय.६७ वर्षे) कोरोनामुळे सोमवारी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मुत्यु झाला.

कोरोनाचा पाथर्डी तालुक्यातील हा पहीला बळी असुन,यामुळे नागरीकामधे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील या वृद्ध महीलेला

काही दिवसापुर्वी श्वसनाचा त्रास होवु लागल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.

तेथे त्यांचा घशातील स्त्राव घेवुन तपासणी करण्यात आली असता. त्यांचा कोरोनाचा अहवाल पाँझीटीव्ह आला होता. उपचार सुरु असताना सोमवारी वृद्ध महीलेचा नगर येथे मृत्यु झाला.

महीलेचा मुलगा पाथर्डी येथे पोलिस कर्मचारी म्हणुन सेवा करीत आहे. तालुक्यातील कोरोनाची संख्या १६५ झाली आहे.

सोमवारी शहरातील तिन जण पाँझीटीव्ह आढळुन आले आहेत. या वृद्ध महीलेचा मृत्यु झाल्याने नागरीकामधे कोरोनाची भिती आणखी वाढली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24