अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील पोलिस पाटील रेवणनाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी विष पिऊन आत्महत्या केली.
काळे यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
दुधाला भाव नसल्याने काळे यांनी विष घेतले, असे त्यांचे बंधू अरुण काळे व शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले.
मृत काळे यांच्याकडे २० गायी असून दररोज ७० लिटर दूध डेअरीला जाते. दर कोसळल्याने ते नाराज होते.
सारखी चिंता व्यक्त करत होते असे सांगण्यात आले. दूध आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके, जितेंद्र भोसले यांनी काळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com