अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस दूर क्षेत्राच्या कार्यालयाची तोडफोड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

नुकताच खर्डा येथील दूर क्षेत्राच्या कार्यालयाची अज्ञात इसमाकडून तोडफोड पोलिसांचे कार्यालयच असुरक्षित तर जनतेची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की जामखेड तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत खर्डा दूर क्षेत्र हे फार वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी एक एपीआय व सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

परंतु ऐन दिवाळीच्या काळात 17 नोव्हेंबर रोजी पहाटे एका अज्ञात इसमाने दूरक्षेत्राच्या इमारतीत प्रवेश करून कार्यालयाचे कुलूप तोडून आतील खुर्च्या, टेबल व फर्निचरची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे.

दिवाळी असल्याकारणाने येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. खर्ड्यातील सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांच्या ही बाब लक्षात आली ,

लोक जमल्याने हा अज्ञात इसम मनोरुग्ण वाटला तेवढ्यात त्याचे नातेवाईक या ठिकाणी आले व त्यांनी या इसमास  घेऊन गेले. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता तो मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही असे सांगितले.

जनतेला न्याय देणारे कार्यालयाची तोडफोड होत असेल तर व त्या इसमावर  कारवाई का होत नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे, की हे प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24