अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- मुंबई येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) पाडूरंग ज्ञानदेव देवकाते यांच्या पत्नी अमिता पांडुरंग देवकाते वय वर्षे २७ यांनी मंगळवार दि.१४ रोजी दुपारी थिटे सांगवी
ता. श्रीगोंदा येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस अधिकारी पतीसह इतर चौघांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पतीचे अनेक महिलांशी असलेल्या अनैतिक संबध व हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक ,मानसिक व सतत शिवीगाळ करून मारहाण होत असल्याने अमिता हिने आत्महत्या केल्याचे दाखल फिर्यादीत म्हटले आहे .
मयत अमिता हिचे वडील कैलास दत्तात्रय कोकरे वय ५१ वर्षे रा . पारोडी. ता.शिरुर जि. पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली असून मयत अमिताचा पती पाडुरंग ज्ञानदेव देवकाते , सासरा ज्ञानदेव देवकाते ,
सासु संध्या ज्ञानदेव देवकाते व दिर गणेश ज्ञानदेव देवकाते सर्व रा.थिटे सांगवी ता.श्रीगोंदा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवकाते याचे दुसर्या महिलांबरोबर अनैतिक संबध असल्याने व चार चाकी गाडी घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी मयत अनिताचा शारीरीक व मानसिक छळ करून मारहाण होत होती.
सासू,सासरे हे मुलास सांगून मयत पत्नीकडे सतत हुंड्याची मागणी करून छळ करायचे.त्यामुळे अखेर अमिताने मंगळवारी एक वाजेच्या सुमारास छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन
आत्महत्या केली व आपले जीवन संपविले असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय सातव,
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण माळी हे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews