ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : मयतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली अंगावर काटा आणणारी माहिती….

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयालातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सुरुवातीला 10 जणांचा मृत्यू झाला होता.

तर 1 रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारा दरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

दरम्यान मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहेत. मृतांमध्ये सहा पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे.

1) रामकिशन विठ्ठल हरपुडे, 2) सिताराम दगडू जाधव, 3) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे, 4) कडूबाई गंगाधर खाटीक, 5) शिवाजी सदाशिव पवार, 6) कोंडाबाई मधुकर कदम,

7) आसराबाई गोविंद नागरे, 8) शबाबी अहमद सय्यद, 9) दिपक विश्वनाथ जडगुळे अशी या मृतांची नोवे आहेत. 11 मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख समोर येऊ शकलेली नाही.

जिल्हा रुग्णालयात आगीमध्ये मृत पावलेल्या मयतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला आहे यामध्ये 6 रुग्ण गुदमरून मयत झाला आहे.

एकाचा 61% भाजून मृत्यू झाला आहे तर 4 जणांचा भाजून मृत्यू झाला असून एक जणाचा व्हिसेराचे मत राखून ठेवण्यात आले आहे.

असे गुदमरून सहा भाजलेले चार आणि विसरा राखून ठेवलेला एक अशा 11 रुग्णांचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला असून आता या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सरकार काय ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये येत असून ते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office