अहमदनगर ब्रेकिंग : वीज कर्मचाऱ्याने वायरने घेतला गळफास !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने रविवारी सर्व्हिस वायरने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता बसस्थानकासमोरील जिजाऊ चौकातील फ्लॅटमध्ये ही घटना घडली.

संजय रंभाजी गावडे (वय २४, डिग्रस) असे मृताचे नाव आहे. गावडे व महावितरणचे अन्य कर्मचारी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दुपारी इतर कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेले असता गावडेने पंख्याला सर्व्हिस वायर बांधून गळफास घेतला.

इतर कर्मचारी रूमवर गेल्यानंतर आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता गावडे याने आत्महत्या केल्याचे दिसले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डिग्रस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24