अहमदनगर ब्रेकिंग : नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा बनाव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील कोहकडी गावातील सतीश सुखदेव गायकवाड याने नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा  बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासात या फसव्या अपहरणाची सत्यता उघड केली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह अपर पोलिस अधिक्षक अजित पाटील उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश गवळी सपोनि विजयकुमार बोत्रे पो.काॅ.भालचंद्र पो.काॅ.राठोड यांनी केला भांडाफोड

सतीश गायकवाड व व त्याचा मित्र निखिल भानुदास गागरे राहणार- ताहराबाद तालुका – राहुरी या दोघांना आळेफाटा ता- जुन्नर येथून ताब्यात घेतले आहे.दोन दिवस बिबट्याने तरुणाचे अपहरण केले म्हणुन वनविभागासह पोलिसांना ही त्याच्या तपासाच्या कामाला लावले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24