अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेल येथे सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राचे छायाचित्र काढून
सामाजिक कार्यकर्त्याने शिवभोजनची तक्रारी थांबविण्यासाठी 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केल्याची तक्रार अजित गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला केली आहे.
शहरात शिवभोजनच्या तक्रारी वाढल्या असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दि.15 मे रोजी शिवभोजन थाळीचे वाटप सुरु असताना सामाजिक कार्यकर्त्याने रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेलमध्ये येऊन शिवभोजन वाटपाचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली.
त्याला विचारणा केली असता सामाजिक कार्यकर्ता असल्याचे व पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्याचे त्याने सांगितले. तर शहरात दहा शिवभोजन केंद्र असून,
यासंबंधी तक्रार व बातम्या थांबवायच्या असल्यास प्रत्येक सेंटरकडून 50 हजार प्रमाणे 5 लाख रुपये देण्याची मागणी सदर व्यक्तीने केली. अन्यथा गुन्हा दाखल करण्यासाठी त्याने धमकावले असल्याचे गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com