अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केली असल्याची घटना घडली आहे.
सदर घटना ऑगस्ट 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी दरम्यान घडलेली असून या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी- अविनाश नवनाथ दरेकर, रा पारनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासबंधीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पारनेर येथील आरोपीने अल्पवयीन मुलीचा अनेक वेळा पाठलाग करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. आरोपीस ही मुलगी अल्पवयीन माहीत असतानाही
या मुलीच्या भावास मारण्याची धमकी देऊन तिला अहमदनगर येथील लॉजमध्ये बळजबरीने घेऊन जाऊन दोन-तीन वेळा तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.
तसेच दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चिंचोली येथून बसस्टॉप येथून पांढर्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून आळंदी (पुणे) येथे घेऊन जाऊन जबरदस्ती लग्न केले.
तसेच सदरची बाब कुणाला सांगितली तर भावास मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या वरील फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com