अहमदनगर ब्रेकिंग : दहावीला गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून शाळेच्या शिपायाकडून मुलीवर बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या शाळेतील शिपायाने दहावीच्या परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकवर्गांत खळबळ उडाली आहे. सुंदर पोपट कसबे (राहणार-दहिगाव, तालुका-शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर पीडितेस सुंदर कसबे याने शेवगाव तालुक्यातील एका शाळेवर दहावीच्या वर्गात प्रवेश घ्यायला लावला.

सन 2019 मध्ये त्याच्या दुचाकीवर बसवून बळजबरीने दहिगाव येथील त्याच्या शेतावर नेत दहावीच्या परीक्षेत मदत करून जास्त मार्क मिळून देतो, असे म्हणत त्याने अत्याचार केला.

तसेच, फेब्रुवारी 2020 मध्ये कसबे याने मला दहिगाव येथील त्याच्या राहत्या घरी राहण्यासाठी नेले. त्याच्या पत्नीला खोटे बोलून त्याने मला वेळोवेळी शेतात घेऊन जात माझ्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखाव्यात यासाठी अनेकदा आंदोलने झाली, कडक उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजनही झाली परंतु महिलांवरील अत्याचारात मात्र घेत होताना दिसत नाही. अशा घटना महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक ठरत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24