अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनील रमेश पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तीला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता. सदरची मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले.

डिसेंबर २०१९ ते ४ जानेवारी २०२० रोजी दरम्यान आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग करून तिला तसेच तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीने मुलीला आरोपीने त्याच्या घरी नेवून तिच्यावर अत्याचार केला.

त्यापासून पीडित मुलगी ही सात आठवडे व सहा दिवसांची गरोधर आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात सुनील पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24