अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा शेतात तरुण महिलेवर सामूहिक बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालक्यातील संवत्सर शिवारात एक ३२ वर्षाची तरुण महिला शेतात गवत कापत असताना तिच्यावर 3 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दुपारी ३ च्या सुमारास संवत्सर शिवारातील एका शेतात आरोपी राहुल पंढरीनाथ सोनावणे , वय २६ , विशाल रामराव गिरे , वय ३६ , सोमनाथ तुकाराम गायकवाड , वय २४ सर्व रा . रामवाडी , ता कोपरगाव यांनी महिलेला धरुन तोंड दाबून उचलून नेवून मक्याच्या शेतात नेले व तेथे आळीपाळीने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

या घटनेने संवत्सरसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की . पिडीत महिलेने आपल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, गवत कापत असताना राहुल सोनावणे , विशाल गिरे , सोमनाथ गायकवाड हे तिघे आमच्या शेतात आले.

सोमनाथ गायकवाड याने तोंड दाबून विशाल गिरे याने पाय पकडले व राहुल सोनवणे याने हात पकडून शेजारील मक्याच्या शेतात नेले व आळीपाळीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझा पती व मुलासी जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून तीनही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24