अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील शिरपुंजे परिसरात राहणारी एक ५५ वर्ष वयाची गरीब मागास शेतकरी महिला तिच्याजवळील जनावरे चारण्यासाठी जायनावाडी गावच्या शिवारात गेली होती
तेथे काल दुपारी १२ . ३० वाजता आरोपी राजू गणपत सोनवणे , वय ५० वर्ष , रा . शिरपुंजे , ता . अकोले हा आला व महिलेला धरुन खाली पाडून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करुन बलात्कार केला .
या घटनेने महिला प्रचंड घाबरून गेली . तिने थेट नातेवाईकांच्या मदतीने राजूर पोलीस स्टेशन गाठले . तेथे वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन आरोपी राजू गणपत सोनवणे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोसई खेरनार हे फरार आरोपीचा शोध घेत आहे .
या घटनेने अकोले तालुक्यात महिला वर्गात खळबळ उडाली आहे . जनावरे चारायला जाणाऱ्या महिलाह सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे .
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com