अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा माणिकदौंडी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर १५ एप्रिल रोजी तसेच २ मे रोजी दुपारी

आरोपी शाहरुख शाम्मद बेग , रा . बेगवस्ती माणिकदौंडी , पाथर्डी याने इच्छेविरुद्ध बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीने बलात्कार केला.

तसेच पिडीत मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. १५ वर्षाच्या पिडीत मुलीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी शाहरुख बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी डिवायएसपी मंदार जावळे , पोनि. रत्नपारखी यांनी भेट दिली. या गंभीरप्रकरणी पोनि रत्नपारखी पुढील तपास करीत आहेत.या संतापजनक घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी अद्याप फरार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24