अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- राहुरी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षं वयाच्या शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर राहुरीत घरात बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
विशेष म्हणजे सदर तरूण शिक्षिकेला आरोपी धीरज रामराव नाईकवाडे, रा. अहमदपूर, ता.अहमदपूर, जि. लातूर याने वेळोवेळी तुझा भाऊ, तुझी आई, बहीण यांना जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन तसेच तुझी बदनामी करेन,
असे धमकावून वेळोवेळी राहुरी परिसरात एका घरात तसेच अहमदपूर येथे राहत्या घरी तसेच पैठण तालुक्यातील भाड्याच्या खोलीत व शिर्डी येथील एका लॉजवर वेळोवेळी धमकावून बलात्कार केला.
हा प्रकार २०११ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत घडला , काल या शिक्षिकेने राहूरी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार करून आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याने पिडीत तरूण शिक्षिकेकेडून शिक्षक बँकेचा ७ लाख रू. रकमेचा चेक बळजबरीने घेतला,
असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोनि. देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि बागुल हे पुढील तपास करीत एका शिक्षिकेला अशाप्रकारे धमकीला घाबरून अत्याचाराला सामोरे जावे लागले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved