जामखेड :- कोरोनाबाधित वृध्दाच्या मृत्यूनंतर त्याची दोन मुले पॉझिटिव्ह निघाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्ती मात्र कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले.
एका नगरसेवकासह १८ जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह अाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी सांगितले.
आता या सर्वांना डॉ. आरोळे हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. निगेटिव्ह अहवालांमुळे जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या इतरांनीही स्वतः हून तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन शहरातील मौलाना, तसेच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शासनाच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे केले आहे.
संपूर्ण जामखेड शहर हाॅटस्पाॅट आहे. कोरोनाबाधितांचा तो भाग प्रशासनाने पूर्णत: सील करुन नागरिकांना संचारबदी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®