अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (5.58 PM) :- संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असून एकाच दिवशी तब्बल 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.या मुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांत आजची संख्या सर्वात मोठी आहे. आता सापडलेल्या रुग्णात शहरातील बारा व तालुक्यातील चौदा अशा 26 रुग्णांचा समावेश आहे.
आजच्या दिवसभरात तब्बल 31 नव्या रुग्णांची भर पडल्याने संगमनेरातील बाधितांची संख्या 266 झाली आहे. आज सकाळी सुरुवातीला दोघांचे व नंतर पाच महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
आत्ता मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील नवघर गल्ली परिसरातील 55 वर्षीय महिला, गणेशनगर परिसरातील 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला,
भारतनगर परिसरातील 39 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 45 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, मेनरोडवरील 43 व 19 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, एकता चौक परिसरातील 43 वर्षीय पुरुष,
38 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 21 वर्षीय तरुण. तर तालुक्यातील निमोण येथून सहा वर्षीय बालक, माहुली येथील 56, सात, पाच, बारा वर्षीय मुलगी, 30, 28, 35 पुरुष व सात वर्षीय मुलगा,
साकुर (चास, अकोले) येथील 65 वर्षीय वृद्ध, तळेगावमधून 40 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला, गोल्डनसिटीतून 25 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगी आदींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews