अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसच्या संशयिताचे रिपोर्ट्स आले, आणि डॉक्टर म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- चीनमधून नगरमध्ये आलेल्या एका व्यक्तीस नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले होते. या व्यक्तीचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास रविवारी मिळाला आहे. 

या नागरिकाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नागरिकास  रविवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

नेवासे तालुक्यातील त्या तरुणाच्या कोरोना व स्वाईन फ्लू आदी तपासण्या करण्यात आल्या. त्या सर्व तपासण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नेवाशाच्या तरूणाचे रक्त व घशातील द्रवाच्या नमुने जिल्हा रूग्णालयाने घेतले होते. तपासणीसाठी ते पुण्याला पाठवण्यात आले होते.

त्याचा तपासणी अहवाल रविवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. अहवाल येताच डॉक्टरांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चीनमधून हा नागरिक जिल्ह्यात आला होता. त्यानंतर यास सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागला. श्रीरामपूर येथील रुग्णालयात त्याने उपचार घेतले होते.

शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला रविवारी सकाळी प्राप्त झाला.

 

तपासणी अहवालात मात्र कोणत्याही आजाराचे लक्षण आढळलेले नाही. ‘तपासणी अहवाल निगेटिव्ह आहे, त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही,’ असे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.
अहमदनगर लाईव्ह 24