अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नगर – मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांची लूटमार करून धुमाकूळ घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरिफ गफुर शेख (वय 25 रा. अवघड पिंपरी ता. राहुरी), सागर गोरख मांजरे ( वय 24 रा. मलापुर ता. श्रीरामपूर), अविनाश श्रीधर साळवे (वय 22 रा. रहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय 23 रा. पिंपळवाडी रोड, राहता), चेतन राजेंद्र सणासे (वय 19 रा.राहाता),
अक्षय सुदाम माळी (वय 22 रा. राहाता ), अक्षय सुरेश कुलथे (वय 20 रा. राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्रे (वय 22 रा. धामोरी खुर्द ता. राहुरी) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीने 17 ते 21 मे दरम्यान नगर मनमाड रोडवरील वेगवेगळ्या ठिकाणी तीन वाहनचालकांना अडवून त्यांना हत्यारांचा धाक दाखवून त्यांची लूटमार केली होती. या प्रकरणी कोपरगाव व लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या टोळीतील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींवर नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पहाटे तीननंतर लूटमार
टोळीतील हे आरोपी राहुरी येथील एका शेतात रात्री एकत्र जमायचे. पहाटे तीन नंतर मोटरसायकलवरून नगर-मनमाड महामार्गाने रेकी करायचे. एकटा वाहनचालक दिसला की त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटायचे.
त्यानंतर सदर वाहनचालकाने या घटनेची कुणाला माहिती देऊ नये यासाठी त्याचा मोबाईल फोडून टाकायचे. लुटमार होत असताना यांच्यातील एक आरोपी इतर वाहने व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवून असायचा.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डॉ. सागर पाटील उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख,
सहाय्यक फौजदार नाणेकर, हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, संतोष लोढे, विशाल दळवी, रंजीत जाधव, राहुल सोळंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, किरण जाधव, सागर सुलाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com