अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्तीचा राग मनात धरुन तो घरी नसतांना त्याच्या घरी जात घराची कडी वाजवून चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब धोडींराम सावंत व त्याच्या सात साथीदारांनी गावातील महिलेचा विनयभंग केला.
या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिलेखनवाडी येथील सौ. अलका दिलीप पवार या महिलेचे पती दिलीप पवार यांनी गावातील सावंत व गुंजाळ यांच्या मुलाचे वाद चालू होते.
हे बघून या महिलेचा पती भांडणे सोडविण्यासाठी पुढे गेल्याने त्याचा राग मनात धरुन पती घरात नसतांना मंगळवार (दि.26 मे) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास
आरोपी चिलेखनखाडीचे सरपंच भाऊसाहेब धोंडीराम सावंत व त्यांचे कार्यकर्ते अचानक घरात घुसले व कुठे गेला दिलीप लई भांडणे सोडवायला मध्ये – मध्ये येतो, असे म्हणून शिवीगाळ करु लागले.
तेंव्हा त्या म्हणाल्या माझे पती घरात नाही असे म्हणताच सरपंच भाऊसाहेब सावंत याने या महिलेचा हात धरुन देविदास तुकारामी सावंत याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
यावेळी पोपट सावंत, संदिप सावंत, रावसाहेब सावंत, अनिल डुकळे, सचिन वाघमोडे, सुभाष सावंत यांनी मला वाईट शिवीगाळ करुन हिला सोडूच नका, हिला ठार मारा, असा दम देत विनयभंग केला. त्यामुळे चिलेखनवाडी येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली
दरम्यान या प्रकरणी सरपंच भाऊसाहेब सांवत सह वरील सात जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews