अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनच्या धान्य वाटपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर
गावचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल जगन्नाथ गिते यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांनी अटक केली.
रविवारी पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अस्मिता वानखेडे यांच्यासमोर हजर केले असता गीते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आदर्श गाव लोहसर येथे १२ मे रोजी धान्य वाटपावरून सरपंच गिते व शिवाजी (गंगाधर) वांढेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्यानंतर त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.
दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. गिते यांनी १५ जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले. वांढेकर यांनी पाच आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले.
शिवाजी वांढेकर यांना मारहाण झाल्याने त्यांनी दिलेल्या जबाबावरून सरपंच गिते यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला होता.
सरपंच गिते नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना शनिवारी त्यांना अटक केली. त्यांना कोर्टाने २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान गिते यांचे चार साथीदार फरार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com