अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, यामुळे शंकरराव गडाख यांनीही तातडीनं कोरोना चाचणी केली असून सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
काल दि 17 जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी दि 18 जुलैला माझा स्वॅब दिलेला आहे . त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे .
आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी त्यांच्या फेसबुक पेज व्दारे केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com