अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- तालुक्यातील झालेल्या गोळीबारात येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश श्यामराव गिरे (वय 38, रा. भोजडे चौकी, कोपरगाव) यांचा मृत्यू झाला.
पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची चर्चा असून मृत गिरे यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते.
या बाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी गिरे हे आपल्या घरी होते. चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
गिरे यांच्या डोक्यात पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. चॉपर, तलवारीने वार केले. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले.
गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तत्काळ त्याच गाडीतून पसार झाले. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आपल्याला मारण्यासाठी कोणीतरी आले आहे, हे समजल्याने गिरे यांनी घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढला. मात्र, मागील दाराजवळसुद्धा काहीजण उभे होते.
तरीही ते जिवाच्या आकांताने शेताच्या दिशेने पळाले. त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातच त्यांना मृत्यू झाला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com