अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात एकुण सहा रुग्ण मिळून आले आहेत. यात कुरण येथेल एकाचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून आला आहे तर शहरातील दोन रिपोर्ट खाजगी तपासणीतून आले आहेत.
त्याच बरोबर तीन जणांची तपासणी अॅन्टीजन टेस्टनुसार करण्यात आली होती. त्यात गुंजाळवाडी येथील एक, सिन्नर तालुक्यातील एक तर तळेगाव येथील एक असे तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
त्यामुळे आज संगमनेरात सहा रिपोर्ट पाझिटीव्ह मिळून आले आहेत. तर तळेगाव परिसरात पहिल्यांदाच कोरोनाचा प्रवेश झाल्याचे समोर आले आहे.
एक विशेष बाब म्हणजे शिवाजीनगर परिसरात राहणार्या एका माजी नगरसेवकाला देखील कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यापुर्वी देखील माजी नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाली होती.
हे नगरसेवक महोदय गेल्या कित्तेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत होते. त्यातुनच त्यांना कोरोना झाला असून त्यांच्या सोबत असणारे समाजसेवक देखील आता होमक्वारंटाईन केले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews