अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी या अरणगाव परिसरातून एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हीघटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून तरुणीने आत्महत्या केली असावी, या दृष्टीनंही पोलिस तपास सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता वारे ही विद्यार्थिनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा या दृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत.
या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही विद्यार्थिनी लहानपणापासून डोणगाव या आपल्या आजोळी राहण्यास होती. तिने यावर्षी 12 वीची परीक्षा दिली होती. तिचे मूळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापूर आहे.
ही मुलगी गुरवार दि १८ रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती.
या नंतर तिसर्या दिवशी शनिवारी सदर मुलीचा शोध घेत आसताना नातेवाईकांना तिचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजता डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथील विहीरीत तरंगताना आढळून आला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल शिवाजी भोस , काँस्टेबल विष्णू चव्हाण,
बाजीराव सानप, अजय साठे, शशिकांत म्हस्के, पोलिस मित्र अमोल यादव, शुभम यादव, पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी भेट देत विहीरीतून मृत विद्यार्थीनीचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढला.
मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews