अहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-दारूच्या नशेत पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर पतीने विहिरीत स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणारी जिलेटीनची कांडी तोंडात धरून त्याचा स्फोट घडवला आणि आत्महत्या केली.

संगमनेर तालुल्यातील पठारातील एलखोपवाडी (गाढवलोळी) येथे आदिवासी युवकाने घरगुती भांडणातून जिलेटिनचा स्फोट घडवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.

सुखदेव किसन मधे (४६) असे त्याचे नाव आहे स्फोटाने शिर धडापासून वेगळे झाले. डोक्याच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडली. सुखदेव दारुच्या नशेत घरी आला.

पत्नीशी त्याचे वाद झाले. त्याने जिलेटिन कांडी तोंडात धरून वीजप्रवाह सुरु केला. त्यामुळे मोठा स्फोट झाला. जवळपासचे लोक घटनास्थळी धावले. समोरील दृष्य पाहून अनेकांना धडकी भरली.

सुखदेवचे मुंडके धडावर राहिले नव्हते. डोक्याच्या चिंधड्या झाल्या होत्या. या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित,

निरीक्षक अंबादास भुसारे, सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून शिर्डीच्या बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. सुखदेवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24